माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा उपक्रम राज्यभर पोहचला असून हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेची तयारी करीत आहेत.
My vision Navoday admission jnvst23_marathi |
कोविड 19 च्या जागतिक संकटामुळे चालू झालेल्या या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. मागिल दोन वर्षांत या उपक्रमाचे राज्यभरातील 270 पेक्षा विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश पात्र झाले आहेत. या उपक्रमामुळे शहरी विद्यार्थ्यांना तर लाभ मिळतोच आहे पण ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमाचे लाभार्थी आहेत.jnvst23_marathi
पहाटे सहा वाजता ची धनराज परगे सरांची तासिका करण्यात विद्यार्थी साडेपाच पासूनच तयारीला लागतात, पालक आणि विद्यार्थी दोघेही या क्लास चा लाभ घेतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याच्या पद्धतीमुळे परगे सरांच्या तासिकेची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यानंतर सात वाजता गोवर्धन शिंदे सरांच्या तासिकेसही विद्यार्थ्यांची पसंती असते. भाषा विषयाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवावेत, भाषा विषयाचा अभ्यास कसा करावा याच्या टिप्स शिंदेसर देत असतात त्यामुळेही त्यांचे शिकवणे विद्यार्थ्यांना आवडते. सायंकाळी सात वाजता माझी मानसिक क्षमता चाचणी ची तासिका असते, माझी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना व पालकांना आवडते असे ते वारंवार कमेंट करून सांगत असतात. या सर्वांचा परिणाम म्हणून माय व्हिजन नवोदय ॲडमिशन हा उपक्रम राज्यव्यापी विद्यार्थी प्रिय, पालक प्रिय व शिक्षक प्रिय ठरला आहे.jnvst23_marathi
हा उपक्रम राज्यभर पसरविण्यात राज्यभरातील शिक्षक मित्रांचेही मोठे योगदान आहे पण आता पालकही पुढाकार घेत आहेत. नानेगाव या. पैठण, जिल्हा औरंगाबाद येथील शिक्षणप्रेमी पालक श्री. श्रीराम जगदाळे यांनी आपल्या पाल्यांना तर माय व्हिजन नवोदय ॲडमिशन या उपक्रमाचे मार्गदर्शन मिळवून देत होतेच पण आपल्या गावातील इतर विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळाला पाहिजे या विचारातून शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक श्री. मैड सर यांच्याशी चर्चा करून माय व्हिजन चे लाईव्ह क्लास शाळेतील डिजिटल क्लास रूम मध्ये प्रोजेक्टर च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहेत आणि यासाठी ते स्वतः वेळ देत आहेत. विद्यार्थ्यांप्रति त्यांची ही तळमळ कौतुकास्पद आहे. खालील व्हिडिओ मध्ये आपण विद्यार्थी लाईव्ह क्लास करीत असताना पाहू शकता.
जेथे जेथे या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे शक्य आहे तेथील शिक्षकांनी व पालकांनीही विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळवून द्यावा. होतकरू, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या आयुष्यात सोनं व्हायला वेळ लागत नाही. आम्ही लाईव्ह घेत असलेले क्लास आपण लाईव्ह विद्यार्थ्यांना दाखवले पाहिजेत असे काहीच नाही आपण आपल्या वेळेनुसार या व्हिडिओ कधीही दाखवू शकता, समजला नसेल तर कितीदाही रिपीट करू शकता..... आणि यासाठीच आम्ही लाईव्ह क्लास घेण्यासाठी युट्यूब लाईव्ह हे माध्यम निवडले आहे.jnvst23_marathi
आपल्यापैकी बरेच शिक्षक आणि पालक या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना आणि पाल्यांना या उपक्रमाचा लाभ देत असतीलच. आपले या उपक्रमाबद्दलचे मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आपण या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये आपले मनोगत, सूचना, अभिप्राय नोंदवू शकता. आम्ही आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करू.
धन्यवाद ....🙏😊
आपलाच,
संतोष सुतार, 8600250052
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा